इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :
श्री बालाजी माध्यमिक स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे मा. अभयकुमार बाबेल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सध्याच्या काळात विद्यार्थी मिडीया व मोबाईलच्या पारतंत्रामध्ये आडकले आहेत. त्यातून प्रथम स्वातंत्र्य व्हावे. देशातल्या समस्यांचा विचार करुन देशाचा विकास करावा. समाजिक जबाबदारी ओळखून राहिलात तर देशसेवा आपोआपच घडेल. स्वच्छतेची सवय स्वतः पासूनच लावा. शाळेतील शिक्षण व शिस्तीमधून चांगले नागरिक घडतील. देशाच्या विकासासाठी शिक्षण हेच प्रगती घडवणारे माध्यम ठरावे. वे हे काम शिक्षकांनी करावे असा आशावाद व्यक्त केला.
संस्थेचे चेअरमन व कार्यक्रमाचे अध्यक्ष मदन कारंडे यांनी आपल्या आध्यक्षिय मनोगतामध्ये देशाच्या ७८ व्या स्वातंत्र दिन साजरा करताना विद्यार्थ्यांनी सध्याच्या काळातील ज्वलंत प्रश्नांचा विचार करुन देशाच्या विकासाचे ध्येय बाळगून जीवन जगावे, विद्यार्थ्यांनी जगाची ओळख करुन घ्यावी व स्वतःमध्ये बदल करुन आपली कामाची पध्दत, राष्ट्राप्रतीची भावना, उदंड देशाभिमान व नव-नवीन संशोधनाच्या माध्यमामधून अखंड मानवजातीच्या उपयोगाचे अनेक शोध लावून स्वतःबरोबर जगाला सावरावे. विद्यार्थ्यांनी स्वतःचा वेळ अभ्यास व नव-नवीन शोधा साठी व कार्यासाठी देऊन समाजाला व देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी घालवावा असा बहुमोल संदेश दिला.
प्रशालेमध्ये देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहण संस्कार सत्संग मंडळाचे अध्यक्ष व जैन प्रकोष्टचे अध्यक्ष मा. अभयकुमार शांतीलाल बाबेल यांच्या शुभ हस्ते, होऊन कार्यक्रमास सुरवात झाली. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व ध्वजगीत झाले. प्रशालेतील एम.सी.सी. कॅडेट व स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला, प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांना संचलनासह मानवंदना दिली.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. 'एम.एस. रावळ मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिना निमित्त महत्वपूर्ण संदेश दिला. सध्याच्या काळात विद्यार्थी वर्ग व बरेचजण मिडीया व मोबाईलच्या जाळयात आडकले आहेत त्यातून बाहेर पडून देशाच्या समस्येकडे पहा. स्वतः घडून इतराना घडवा. सध्याच्या काळात देशापुढील आव्हाने फार मोठी आहेत त्यानुसार आपण सर्वांनी स्वतःमध्ये बदल घडवणे गरजेचे आहे. समाजातील सर्वच घटकांनी शिक्षक, पालक विद्यार्थी आपण सर्वांनी समाज व देशाचा विचार करुन आपले कार्य प्रामाणीकपणाने व जबाबदारीने करावे. असे बहुमोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थिनी कु. श्रावणी पसारे, कु. गौरी मिरगणे व कु. गोजिरी आरगे यांनी अत्यंत मोजक्या पण प्रेरणादायी शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक शिवाजी कारंडे, दत्तात्रय म्हेत्रे, सौ. सुंदरा जोशी मॅडम, संजय झुंजकर, व संदीप जाधव व गणेश माच्छरे इत्यादी मान्यवर व पालक, माजी विद्यार्थी/विद्यार्थिनीसह सर्व हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, ऑल्पियाड विभागाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. एस. व्ही. पाटील मॅडम यांनी केले.
