इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :
दत्तवाड:बांबरवाडी,दत्तवाड मध्ये ७८ वा भारतीय स्वातंत्र्यदिन मोठया उत्साहात संपन्न झाला.विद्या मंदिर बांबरवाडी येथे ज्येष्ठ नागरिक दौलू मोतीराम चव्हाण यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर पावडोबा विकास सोसायटी येथे नारायण चव्हाण यांचे हस्ते झाले.याप्रसंगी विद्यार्थ्यांची मातृभूमी,देशभक्त, क्रांतीतिकारक यांच्या विषयी सुंदर भाषणे झाली.
दि.१३ऑगस्ट रोजी शालेय पोषण आहार चे मदतनिस आण्णासो पोवार तर दि.१४ ऑगस्ट रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सर्वसामान्य व विद्यार्थ्यांना ध्वजारोहण केले.याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
याप्रसंगी मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे,अध्यापक निलेश माने,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा कविता पाटील,सदस्य दिलीप चव्हाण,नामदेव चव्हाण,कोमल चव्हाण,इंद्रायणी चव्हाण, अंगणवाडी सेविका रेखा चव्हाण,पांडुरंग चव्हाण यांचे सहपालक,ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
