Top News

शिवार न्यूजचे पत्रकार अजित कांबळे यांच्या हस्ते बोरगाव येथे ध्वजारोहण

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

 अखंड जगामध्ये भारत देशाचा 78 वां स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.या अनुषंगाने आज बेळगाव जिल्ह्यातील बोरगाव टेक्सटाइल पार्क यांच्यावतीने स्वातंत्र्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते . प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस देव माळी, संजय महाजन व बंडू माळी यांनी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले तर प्रगतशील शेतकरी व ऊस वाहतूकदार बिरू हांडे व सर्जेराव धनवडे यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाला चालना दिली. यानंतर धवल भिवरे या उद्योजकांनी स्वतंत्र दिनाच्या ध्वज कट्ट्याला पुष्प अर्पण करून श्रीफळ वाढवले. *. बोरगाव टेक्सटाईल पार्क च्या स्वातंत्र्य दिनाचां ध्वजारोहण बोरगाव येथील पत्रकार अजित कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. बोरगाव टेक्सटाईल पार्कचे चेअरमन नगरसेवक शरद जंगठे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी होते. 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रम दरम्यान बोरगाव येथील वडगीर माळ या शाळेतील मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. *. कार्यक्रमाला उद्देशून बोलताना टेक्सटाईल पार्क चेअरमन व हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नगरसेवक शरद जंगठे म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी सह भगतसिंग राजगुरू व महात्म्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे, त्यांनी केलेल्या कार्याची शिकवण व त्यांचा आदर्श आज आपण डोळ्यासमोर ठेवून कार्य करणे ही काळाची गरज असल्याचे मत शरद जंगठे यांनी केले. यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना टेक्स्टाईल पार्क चेअरमन शरद जंगठे यांच्याकडून विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व नोट बुक वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास नगरसेवक जंगठे,जितू पाटील, अमित माळी, महावीर पाटील, भरत पाटील, उत्तम कदम, फिरोज आफ्राज्, संजय महाजन, सर्जेराव धनवडे, देव माळी, राजू लटलठे, जिनेन्द्र आमनावर, बिरू हांडे, दीपक वाघमोडे, बंडू माळी,धवल भीवरे,दिलीप महाजन यांच्या सह टेक्सटाइल पार्क येथील उद्योजक,मान्यवर,शिक्षक,विद्यार्थी, पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.                               

थोडे नवीन जरा जुने