Top News

दैनिक अप्रतिम चे संपादक रविराज ऐवळे राष्टसेवा सन्मान पुरस्कार 2024 ने सन्मानित



जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

         दैनिक अप्रतिम चे संपादक रविराज ऐवळे यांना स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रसेवा सन्मान पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूरातील जेष्ठ विधीज्ञ धनंजय पठारे, धनंजय खोत, पत्रकार व परिवर्तन फौंडेशनचे अमोल कुरणे व स्वराज्यक्रांती पँथर आर्मी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष संतोष आठवले यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोल्हापूरातील दसरा चौकात असलेल्या ऐतिहासिक राजर्षी शाहू सभागृहात काल 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये समाज्यातील विविध क्षेत्रातील तब्बल 15 अन्य मान्यवरांनाही सन्मानित करण्यात आले. 

        दैनिक अप्रतिम च्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाज्यातील विविध घटकांना न्याय देताना परखड व निर्भिड शब्दात मांडणी करणारे व रोखठोक भुमिका मांडून अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संपादक रविराज ऐवळे हे नेहमीच पुढाकार घेत आलेले आहेत. त्यांनी गेल्या दोन वर्षापासून समाज्यात सत्तेच्या माध्यमातून दहशत माजवू पाहणाऱ्या प्रवृत्तीचा पुर्ण नायनाट करून सर्वांनी निर्भयपणे जगले पाहिजे यासाठी अत्यंत प्ररखड पत्रकारीता करून समाज्याला दिशा देण्याचे काम अत्यंत चोखपणे केले आहे. त्यामुळे त्यांच्या कामाची कोल्हापूरातील परिवर्तन फौंडेशनच्या सदस्यांनी घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली होती. 

        काल सायंकाळी त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करताना पुढील काळात अशाच प्रकारे निर्भिड पणे पत्रकारीता करून सामन्याच्या प्रश्नांना वाचा फोडावी असे सांगत श्री. ऐवळे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी शिरोळ तालुका मराठा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव घुणकीकर व अशोक घोरपडे उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने