Top News

पुरस्कार मिळाल्याबद्दल बाळासो गायकवाड यांचा सत्कार

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळाल्याबद्दल हेरवाड येथील बाळू शिवाजी गायकवाड यांचा भुदरगड तालुका मातंग समाज संघटनेच्या वतीने गारगोटी येथे झालेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार बजरंग अण्णा देसाई, भाजपा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, सरचिटणीस नाथाजी पाटील यांच्यासह भुदरगड तालुका मातंग समाज संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने