शिरोळ/ शिवार न्यूज नेटवर्क :
आतापर्यंत श्री दत्त साखर कारखान्यांमध्ये राजकारणाचा कोणताही लवलेश येऊ दिलेला नाही. सभासदांनी नेहमीच आमच्यावर विश्वास ठेवून प्रेम दिले आहे. यामुळेच कारखान्याच्या संचालक मंडळाची एकमताने आणि एक विचाराने कोणतेही राजकारण न करता कारखाना आणि सभासद हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन काम करण्याची भूमिका आहे. सभासदांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास ठेवून काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन चेअरमन गणपतराव पाटील यांनी केले.
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्तारूढ श्री दत्त शेतकरी विकास पॅनलच्या वतीने आज औरवाड (वजीरबाबा दर्गा) येथे संवाद दौरा झाला, यावेळी ते बोलत होते. सरपंच महंमदशफी पटेल हे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी बोलताना राजेंद्र प्रधान म्हणाले, स्व. सा. रे. पाटील साहेबांच्यामुळे शिरोळ तालूका आणि कर्नाटक सीमाभागात सहजार चळवळ वृद्धिंगत झाली. त्यांनी शेतकऱ्यांची समृद्धी हाच ध्यास घेऊन काम केले. साहेबांच्या विचारांचा, कर्तृत्वाचा वारसा आणि वैभव जपत तो आणखी वाढविण्याचे काम गणपतराव पाटील करीत आहेत. क्षारपड जमीन मुक्तीची चळवळ उभारून त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात नवी उमेद निर्माण केली आहे. दत्त उद्योग समुहाच्या माध्यमातून सभासद आणि शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम, योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा.
स्वागत व प्रास्ताविक राजाराम रावण यांनी केले. बाबू युनूस पटेल, अरमतपाशा पटेल, रशिद पटेल, दादेपाशा पटेल, फैझल पटेल, गोपाळ राऊत आदींनी मनोगत व्यक्त करून सत्तारूढ गटाला गावचा एकमुखी पाठिंबा दिला. आभार रघुनाथ पवार यांनी मानले.
औरवाड येथे संचालक भैय्यासाहेब पाटील, विश्वनाथ माने, अशरफ पटेल, विजय गाताडे, मुस्ताक पटेल, अरुण मंगसुळे, रमेश रावण, राजू जंगम, गौरवाड येथे जयपाल कुंभोजे, बशीर कोल्हापुरे, रावसाहेब गडगले, सरपंच सौ. मोमीन, धोंडीराम चंदुरे आदी उपस्थित होते.
कवठेगुलंद येथे ऋषीराज शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संवाद दौरा झाला. यावेळी रामचंद्र तांबीरे, संजय शिंदे, देवगोंडा पाटील, रावसाहेब पाटील, सुरेश कांबळे यांनी मनोगत व्यक्त करून गावचा 100 टक्के पाठिंबा जाहीर केला. बाळासाहेब पाटील यांनी आभार मानले. अशोक पाटील, मोहन पाटील, रणजितसिंह शिंदे, अविनाश कदम यांच्यासह अनेक संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
गणेशवाडी येथे गणेश गाताडे यांनी स्वागत तर सरपंच प्रशांत अपिने यांनी प्रास्ताविक केले. संचालक विश्वनाथ माने, बाबासाहेब अपिने, दादासाहेब देवताळे, बळवंत गोरवाडे, शरद कांबळे, धनपाल खोत आदींनी ऊस विकासाच्या सर्व योजना शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविल्याचे सांगून गावचा एकमुखी पाठिंबा दिला. शेती प्रगतीचे संपादक रावसाहेब पुजारी यांनीही शुभेच्छा दिल्या. सदाशिव आंबी यांनी सूत्रसंचालन केले. सुहास मडिवाळ यांनी आभार मानले. ज्योतिकुमार पाटील, आप्पासाहेब मडिवाळ, आण्णासाहेब शिंदे, सुभाष शिरगावे, परशराम गौराजे, रावसाहेब साळुंखे, विजयकुमार गाताडे, आनंदा साळुंखे, मल्लाप्पा खटावे, राजेंद्र तासगावे, मल्लाप्पा अंकलखोपे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
शेडशाळ येथील सभेत स्वागत अशोक शिरढोणे यांनी केले. महेश तेरदाळे, डॉ. दगडू माने, सुनील सूर्यवंशी, सुनील संकपाळ, शंकर केरीपाळे यांनी मनोगत व्यक्त केले. गजानन चौगुले, आप्पासो मगदूम, शिवराम केरीपाळे, मनोहर कोथळे, सुरेश चौगुले, रावसो चौगुले, अर्जुन शहापुरे आदींसह शेतकरी सभासद उपस्थित होते.
आलास येथे इम्तियाजपाशा पाटील आलासकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. स्वागत मुनाफ जमादार यांनी केले. यावेळी मेजर असलम मखमल्ला, अजित दानोळे, विश्राम कोळी यांनी मनोगत व्यक्त केले. महावीर उपाध्ये, अब्दुल कादर मखमल्ला, गोविंद कोल्हापूरे, नासर पठाण, शंकर राजमाने, चाँदपाशा पाटील, चंदू उपाध्ये यांच्यासह सभासद उपस्थित होते.
याचबरोबर बुबनाळ (बुबनाळ पाणी पुरवठा संस्था), बस्तवाड (महादेव मंदिर), अकिवाट (बसव मंडप), मजरेवाडी येथील सभासद शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. या संवाद दौऱ्यास शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत चेअरमन गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकास पॅनलला आपला पाठिंबा व्यक्त केला.
