Top News

कु.निदा मुजावर हिचे ऐतिहासिक यश प्रेरणादायी : महंमदहनिफ मुल्ला

कुरूंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

उर्दू विद्या मंदिर आलास शाळेची विद्यार्थिनी कु. निदा आयुबअली मुजावर इयत्ता ५वी शिष्यवृत्ती परीक्षेत उर्दू माध्यमांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम आली. तिचे हे ऐतिहासिक यश प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन शिरोळ तालुका उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष महंमदहनिफ मुल्ला यांनी केले.कु.निदा मुजावर हिच्या सत्काराप्रसंगी बोलत होते.

     गतवर्षी इयत्ता ४ थी प्रज्ञाशोध परीक्षेत ही उर्दू माध्यमामध्ये जिल्ह्यात दुसरी आली होती.  याप्रसंगी शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन अशोक देवसो कोळी, उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस आसिफ मुजावर, मुख्याध्यापिका जबीन मुजावर, मेहबूब मुजावर,फरहान मुजावर,फैजान मुजावर, आफाक मुजावर,हुसेन जमादार,रियाज बाणदार,दिलीप शिरढोणे उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने