शिरोळ/ शिवार न्यूज नेटवर्क :
श्री दत्त साखर कारखानाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने सत्तारूढ श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलच्या वतीने आज राजापूर (महादेव मंदिर), राजापूरवाडी (लक्ष्मी मंदिर), खिद्रापूर (जैन सांस्कृतिक हॉल), सैनिक टाकळी (बाळासो पाटलांच्या घरी), जुने दानवाड (ब्रम्हनाथ मंदिर), नवे दानवाड (हनुमान मंदिर), टाकळीवाडी (बाबासो वनकोरे यांच्या घरी) तर दत्तवाड येथील दत्त मंदिरामध्ये संवाद सभा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. सर्व गावच्या सभासदांनी श्री दत्तची निवडणूक बिनविरोध व्हावी अशा तीव्र भावना व्यक्त केल्या.
श्री दत्त कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील 118 गावांमधील तीस हजाराच्या वर शेतकरी कारखान्याचे सभासद आहेत. या सभासद शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेत, त्यांच्याशी संवाद साधत चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी अर्ज भरण्यापूर्वीच संवाद दौऱ्याच्या माध्यमातून प्रचाराचा धडाका लावला आहे. या प्रचार संवाद दौऱ्यात शेतकरीही उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पाठिंबा व्यक्त करीत आहेत.
गणपतराव पाटील यावेळी म्हणाले, दत्त कारखाना परिसरामध्ये क्षारपड मुक्तीचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे. आगामी काळात या शेतजमिनी मधून ऊस उत्पादन वाढणार आहे. याचा विचार करून कारखान्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त उसाचे गाळप व्हावे, कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर जाऊ नये आणि गाळप कमी वेळेत व्हावा, हा उद्देश ठेवून विस्तारीकरण केले आहे. यामध्ये वैयक्तिक अथवा संचालक मंडळाचा कोणताही स्वार्थ नाही. संचालक मंडळ स्वच्छ, पारदर्शी आणि विश्वासाला पात्र राहण्यासारखेच काम करीत आहे. कारखान्याच्या वतीने पाणी, माती आणि पाने परीक्षण मोफत करून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये वाचवले जात आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर मशिनरीच्या माध्यमातून माती, पाणी, पाने परीक्षणाच्या अद्ययावत यंत्रणेचा आणि विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि सर्वांगाने विचार करून सत्तारूढ गटाला पाठबळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मोहन ढवळे म्हणाले, सहकार चळवळ टिकली पाहिजे ही भूमिका घेवून गणपतराव पाटील यांनी दत्त उद्योग समुहामध्ये काम करत संस्थांना प्रगतीपथावर नेले आहे. राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करताना गणपतराव पाटील यांची काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती, अनुभव आणि निर्णय क्षमता पाहिली की सभासद शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न दिसून येतात. कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच इच्छा सर्व सभासदांची आहे. या निवडणुकीत सभासद खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहून पुन्हा एकदा त्यांच्या पॅनेलला विजयी करतील यात शंकाच नाही.
प्रारंभी स्वागत मौला पटेल यांनी केले. चंदू कोरे, शंकर पाटील, रामा फुलारे आदींनी मनोगत व्यक्त करून पाठिंबा दिला. यावेळी ऍड. मेघा पाटील, संजय पाटील, चंदू गडगे, चंद्रकांत आवटी, विश्वास पाटील, निसार दानवाडे, रावसो गस्ते, अविनाश मिस्त्री, बाबासो पटेल यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते.
राजापूरवाडी येथे स्वागत भास्कर पाटील यांनी केले. सरपंच रावसो कोळी, डॉ. संदीप कोळी यांनी आपले मत मांडले. वाल्मिकी कोळी, मुनीर दानवाडे, सौ. मिनाज जमादार, विजय एकसंबे, आण्णाप्पा दुधाळे, आपगोंडा पाटील, उस्मान दानवाडे, अनिल कोळी, सुरेश पाटील, प्रदीप कोळी आदींसह शेतकरी उपस्थित होते.
खिद्रापूर येथे आप्पासाहेब कुरुंदवाडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. रमेश खोत, राजेंद्र प्रधान, डॉ. जिनेंद्र कागवाडे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक रघुनाथ पाटील, भैय्यासाहेब पाटील, रावसो पाटील नाईक, विजय सुर्यवंशी, ऍड. प्रमोद पाटील, महेंद्र बागे, सुरेश गोधडे, गजानन करे, आण्णासो पाटील आदी उपस्थित होते. मियाँखान मोकाशी यांनी आभार मानले.
सैनिक टाकळी येथे उमेशश्चंद्र पाटील, हरिश्चंद्र पाटील, संभाजी गोते आदिंनी निवडणूक होवू नये अशी भूमिका मांडली. तसेच सत्तारूढ गटाला पाठिंबा दर्शविला. डॉ. विकास पाटील यांनी स्वागत केले. यावेळी वसंतदादा पाटील, शिवाजी पाटील, मोहन पाटील, सुधीर पाटील, सदाशिव पाटील, डी. आर. पाटील, अमरसिंह पाटील, अजितसिंह पाटील, स्वप्निल पाटील, श्रीधर पाटील, संतोष गायकवाड, सुदर्शन भोसले, दादासो शिरहट्टी, बाळगोंडा पाटील उपस्थित होते. श्रीधर भोसले यांनी आभार मानले.
जुने दानवाड येथे सुभाष वडगावे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. डॉ. आबासाहेब करोले, रघुनाथ कांबळे, ए. बी. पाटील, बाबगोंडा पाटील यांनी विरोध करून कारखान्याच्या प्रगतीला कोणी खिळ घालण्याचा प्रयत्न करू नये असे विचार मांडले. आप्पासो पाटील, आलगोंडा पाटील,आण्णासो पाटील नांगरे, कलगोंडा पाटील शिरढोणे, भरमा गुरव, बाबुराव चिंचवाडे, आण्णासो चौगुले, रामगोंडा पाटील, महेंद्र बागे, रावसाहेब मलिकवाडे आदी उपस्थित होते.
