कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत हेरवाड येथील श्लोक विजय पाटील इ. ५ वी हा जिल्हा गुणवत्ता यादीत आला असून तो शिष्यवृत्ती पात्र झाला आहे.
महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा जानेवारी 2024 मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून नरसिंहवाडी येथील विद्यामंदिरचा विद्यार्थी श्लोक विजय पाटील इयत्ता पाचवी हा जिल्हा गुणवत्ता यादीत आला असून तो शिष्यवृत्ती पात्र झाला आहे.
या विद्यार्थ्याला वर्ग शिक्षक तुकाराम पाटील, सरोजिनी खडके, मुख्याध्यापिका विजया पाटील यांचे मार्गदर्शन तर पालक विजय पाटील, स्नेहा पाटील, यांचे प्रोत्साहन लाभले.
