अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगांव येथील हिंदू मुस्लिम धर्मियांचे ऐक्याचे प्रतिक म्हणून मोहरम सणाकडे पाहिले जाते.या सणांमध्ये गावातील सर्व धर्मीय अत्यंत गुण्यागोविंदाने, भक्ती भावाने हा सण साजरा करतात . गावातील धनगर गेट, अपराज गेट, कुंभार गेट, कालीगेट, मिरजे गेट, माळी गल्ली, चावडी व बावा ढंग वली दर्ग्याच्या ठिकाणी सालाबाद प्रमाणे नाल्पीर पंजाची उभारणी करण्यात आली होती. अत्यंत मोहक व रोषणाईने गावात सर्वत्र या ठिकाणी भक्तिमय वातावरण असल्याचे पहावयास मिळत होते. *. काल मोहरम सणाचा मुख्य दिवस, या दिवशी गावातील नालपिरपंज्यांची ढोल ताशाच्या गजरात संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली व श्रीक्षेत्र , ग्राम दैवत असणाऱ्या दर्ग्याच्या परीसरात पीर पंजाची गाठीभेटीचा कार्यक्रम देखील संपन्न झाला. दुपारी करमणूक म्हणून बेरूड व नकटी सोंग यांचा कार्यक्रम करण्यात आला, मोहरम सणाचे मुख्य भाग तांबूत विसर्जन याला विशेष महत्त्व आहे. संध्याकाळच्या सत्रात भर पावसात देखील बोरगाव येथील सर्व धर्मीय मंडळींनी दर्शन घेतले. एकंदर मोहरम सणा निमित्त कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी सदलगा पोलीस ठाण्याहून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
