अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
कडोली येथील एका नराधमाने अखंड मानव जातीला काळीबा फासण्याचे काम केले आहे, घरात कोनी नसल्याचा फायदा घेऊन नराधमाने एका मतिमंद मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे.ही. घटना बेळगांव तालुक्यातील एका गावात सदरची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळवरून मिळालेली अधिक माहिती अशी की पीडित मुलीचे आई वडील शेताकडे गेल्याचा फायदा घेऊन एका क्रूर नराधमाने एका मतिमंद तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, मुलीने आरडओर करताच नजीकच्या तिच्या काकांनी धाव घेऊन त्या नराधमलां मारहाण करताच तो बेशुध्द पडल्याचे नाटक करून तेथून फरारी झाला.
पीडित मुलीसह आई वडील व नातेवाईक यांनी तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनशी धाव घेऊन घटनेची माहिती दिली.पोलिसांनी लगेच बेळगांव ग्रामीण विभागाच्या पोलिसांनि शोध मोहीम राबऊन त्या नराधम आरोपीला अटक केली आहे.
