Top News

डेंग्युने गौरवाडमधील तरुणाचा मृत्यू



अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :

गौरवाड (ता.शिरोळ)येथील संदिप संजय कांबळे (वय ३५ ) या तरुणाचा डेंग्युमुळे मृत्यु झाला असल्याचे समजते. संदिप हे गडहिंग्लज येथील पंचायत समितीच्या गट साधन केंद्रात विशेषतज्ञ म्हणुन कार्यरत होते. कुटुंबासह ते गडहिंग्लज येथेच वास्तवास होते.

 दोन दिवसापूर्वी त्यांना अचानक उलट्या सुरु झाल्याने तेथीलच खाजगी दवाखान्यात उपचार घेतले. मात्र त्रास आणखी वाढल्याने रक्त चाचणी केली असता डेंग्यु झाल्याचे निदर्शनास आले. यानतंर त्यांना कोल्हापुर सीपीआर मध्ये उपचारासाठी आणण्यात येत होते.मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.

थोडे नवीन जरा जुने