Top News

विधानसभा निवडणुक : परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून लढा ऊभारण्याचा निर्णय

 शेतकरी चळवळीतील मुख्य प्रवाहातील शेतकरी संघटनाच्या ज्येष्ठ नेत्यांची संयुक्त बैठक संपन्न



पुणे / शिवार न्यूज नेटवर्क :

   राज्यातील विविध शेतकरी प्रश्नासह होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभुमिवर इतर सर्व संघटना व छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेऊन परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून लढा ऊभारण्याचा निर्णय राज्यातील शेतकरी चळवळीतील मुख्य प्रवाहातील शेतकरी संघटनाच्या ज्येष्ठ नेत्यांची संयुक्त बैठक पुणे येथील नवीन शासकीय विश्रामग्रह येथे पार पडली. 

   यावेळी परिवर्तन आघाडीच्यावतीने बेरोजगारी, वाढत्या शेतकरी आत्महत्या , सातत्याने पडत चाललेले शेतमालाचे दर , कर्जाच्या बोजाखाली दबलेला शेतकरी , केंद्र सरकारचे चुकीचे आयात व निर्यात धोरण, दिवाळ खोरीच्या उंबरठ्यावर असलेली राज्याची आर्थिक स्थिती , राज्यातील सामाजिक , आर्थिक , शैक्षणिक , व आरोग्य विषयक क्षेत्रामध्ये काम करणा-या सामाजिक संघटना यांना सोबत घेऊन आघाडी लढा ऊभारून परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून एक सक्षम पर्याय देण्याचा निर्णय झाला. 

      आघाडीच्यावतीने राज्यातील विविध संघटना व छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेऊन २८८ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. ३० जुलै रोजी औरंगाबाद येथे जागावाटप व पुढील धोरणाबाबत बैठक होणार आहे. या बैठकीस मा. आमदार वामनराव चटप , मा. खासदार राजू शेट्टी , मा. आमदार शंकर आण्णा धोंडगे , अनिल घनवट , ललित बहाळ , डॅा. महावीर अक्कोळे , योगेश पांडे यांचेसह प्रमुख पदाधिकारी ऊपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने