शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ऊस उत्पादक अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील 1 जागेसाठी 1 अर्ज आणि बिगर ऊस उत्पादक व संस्था गटातील 2 जागेसाठी 2 अर्ज असल्याने या दोन्ही गटातील संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध होऊन 3 संचालक निवडून आले आहेत अ वर्ग ऊस उत्पादक गटातील 16 जागेसाठी 22 उमेदवार आणि अ वर्ग ऊस उत्पादक महिला गटातील 2 जागेसाठी 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने संचालक पदाच्या 18 जागांकरिता बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी कारखान्याच्या कार्यस्थळावर मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे याकरिता सोमवारी बोलविण्यात आलेली सर्वसाधारण सभा बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आली असल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली.
श्री दत्त साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या निमित्ताने कारखान्याच्या कार्यस्थळावर सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ संपत खिलारी यांनी स्वागत व प्रस्तावित केले यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विषय पत्रिकेचे वाचन करून सभासदांसमोर बोलताना म्हणाले की श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी निवडणूक घोषित करण्यात आली होती उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली यानंतर उमेदवारी माघाराची मुदत संपल्यानंतर उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले संचालक मंडळातील अ वर्ग ऊस उत्पादक अनुसूचित जाती जमाती गटातील 1 जागेसाठी 1 अर्ज तसेच बिगर ऊस उत्पादक व संस्था गटातील 2 जागेसाठी 2 उमेदवार यांचेच अर्ज असल्याने या दोन्ही गटातील संचालक पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे यामुळे सुरेश कांबळे रणजीत कदम इंद्रजीत पाटील हे तिन्ही उमेदवार संचालक म्हणून निवडून आले आहेत तर संचालक मंडळातील अ वर्ग ऊस उत्पादक गटाच्या 16 जागेसाठी 22 उमेदवार आणि अ वर्ग ऊस उत्पादक महिला गटातील 2 जागेसाठी 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने 18 जागेसाठी ही निवडणूक होणार आहे यासाठी मतदान प्रक्रिया पार पडण्याकरता बुधवारपर्यंत आजची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली आहे.
संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर 67 मतदान केंद्रावर बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होणार आहे तर गुरुवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी सकाळी 8 वाजले पासून मतमोजणी होणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
आभार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सुनील धायगुडे यांनी मानले. यावेळी तहसीलदार अनिलकुमार हेळकर कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील व्हाईसचेअरमन अरुणकुमार देसाई यांच्यासह बिनविरोध म्हणून निवडून आलेले संचालक रणजीत कदम, इंद्रजीत पाटील, सुरेश कांबळे यांच्यासह निवडणुकीच्या रिंगणात असलेले सर्व उमेदवार, सभासद, कारखान्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
