Top News

१०० टक्के पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देणार : सरपंच रेखा जाधव

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

महिलांच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या स्वावलंबनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लाडकी बहीण ही मोहीम आखून महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला आहे. याच माध्यमातून शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेरवाड गावामध्ये सुद्धा १०० टक्के पात्र महिलांना त्या योजनेचा लाभ मिळवून देणार, असल्याची ग्वाही सरपंच रेखा अर्जुन जाधव यांनी दिली. 

हेरवाड ग्रामपंचायतच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि अंगणवाडी सेविकांची बैठक संपन्न झाली, यावेळी सरपंच जाधव बोलत होत्या.

यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या, जयसिंगपूर येथील स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह येथे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुका प्रशासनाची बैठक घेतली होती, त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याच धर्तीवर हेरवाड या ठिकाणी या योजनेपासून कोणतीही महिला वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली घेतली असून त्या दृष्टीने अंगणवाडी सेविकांसह स्थानिक प्रशासनाने काम करावे, असे त्यांनी आवाहन केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्या, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

थोडे नवीन जरा जुने