Top News

मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर

 कुरुंदवाड मध्ये ३.५० कोटी निधीतून मुस्लिम समाज हॉल स्लॅबचा शुभारंभ 

कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळत आहे. या निधीतून शिरोळ तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आम्ही घेतली असून शिरोळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये समाजाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. यापुढेही शिरोळ तालुक्यातील मुस्लिम समाज निधीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेऊन या पुढील काळात ही समाजासाठी लागेल तेवढा निधी देऊ, अशी ग्वाही आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.

कुरुंदवाड येथे आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या फंडातून ३. ५० कोटी रुपये मंजूर निधीतून सुरू असलेल्या मुस्लिम समाज हॉलच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्लॅपचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार यड्रावकर यांचा सत्कार केला. 

यावेळी बोलताना आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, मुस्लिम समाजासाठी शादीखाना, ईदगाह मैदान सुशोभिकरण, हायमॅक्स, दफनभूमिसाठी कंपांऊंड, निवारा शेड, सुशोभीकरण यासह समाजाच्या विकासासाठी शिरोळ तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. कुरुंदवाड शहरात समाजाचा स्वतंत्र हॉल असावा या दृष्टिकोनातून ३.५० कोटी रुपयांचा निधी खर्च करून सुसज्ज अशा हॉलची निर्मिती करण्यात येत आहे. या हॉलचा फायदा कुरुंदवाड शहराबरोबर आसपासच्या गावातील मुस्लिम समाजाला विविध कार्यक्रम राबवण्यासाठी होणार आहे. कुरुंदवाड शहरासह तालुक्यातील मुस्लिम समाज विकासापासून वंचित राहणार नाही, याची मी नेहमीच काळजी घेतली आहे. तालुक्यातील अनेक गावात मुस्लिम समाजाला मोठ्या प्रमाणात फंड उपलब्ध करून देऊन जा - त्या गावातील मुस्लिम समाजाचा विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्या हातून झाला असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

यावेळी माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, विजय पाटील, मुख्याधिकारी आशिष चौहान तानाजी आलासे, माजी नगरसेवक अक्षय आलासे, फारुख जमादार, शकील गरगरे, उदय डांगे, मुस्लिम समाज सेंट्रल कमिटीचे अध्यक्ष इकबाल पटवेगार, मिर अहमद बागवान, मिरासाहेब पाथरवट, शकील भिलवडे, आर्षद बागवान, सलीम जमादार, दस्तगीर फकीर, जहांगीर जमादार, शरद आलासे, महबुब मोमीन, जमील बागवान, असलम जमादार, सलीम बागवान, अशपाक हुक्किरे, शब्बीर भिलवडे, सद्दाम तहसीलदार, जमीर पठाण, अल्लानूर बागवान, राजअहमद गरगरे (सर),अभियंता प्रदीप बोरगे, कॉन्ट्रॅक्टर अक्षय शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने