शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
दानोळी केंद्रांतर्गत सर्व शाळा मुख्याध्यापकांची शिक्षण सप्ताह संदर्भातील कार्यशाळा दिनांक १९ जुलै रोजी केंद्र शाळा दानोळी येथे संपन्न झाली. सदर कार्यशाळेमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे,केंद्रप्रमुख दत्तात्रय जाधवर यांनी शिक्षण सप्ताह आयोजनाबाबत शासन आदेशानुसार करावयाची कार्यवाहीबाबत सखोल मार्गदर्शन केले.
तर मजरेवाडी केंद्रांतर्गत सर्व माध्यम सर्व व्यवस्थापन मुख्याध्यापकांची शिक्षण सप्ताह आयोजनाबाबत कार्यशाळा कन्या नं.1 कुरुंदवाड येथे संपन्न झाली.या कार्यशाळेत शिक्षण सप्ताहबाबत सखोल मार्गदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी एन.व्ही.पाटील,मजरेवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख दत्तात्रय जाधवर सर यांनी केले.याबरोबर कोल्हापूर शालार्थ प्रमुख श्री संजय गायकवाड सरांनी देखील मार्गदर्शन केले.
दि.22 जुलै ते 28 जुलै 2024 या कालावधीत शिक्षण सप्ताह सर्व शाळेत संपन्न होणार असून या अनुषंगाने सर्व शाळेमध्ये विविध उपक्रम राबविले जणार आहेत. पूर्व प्राथमिक ते इयत्ता12 वी पर्यतच्या वर्गासाठी सदर उपक्रम राबविणेत येणार आहेत. बैठकीस जिल्हा परिषद,खाजगी अनुदानित,स्वंयअर्थसहाय्यित सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
