Top News

नृसिंहवाडी दत्तधाममध्ये रविवारी सामूहिक सरस्वती पूजन व विद्यारंभ संस्कार सोहळ्याचे आयोजन



अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाम मध्ये रविवार दि.१४ जुलै रोजी सामुहिक सरस्वती पुजन व विद्यारंभ संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ,त्र्यंबकेश्वर नाशिकचे पीठाधीश परमपुज्य गुरुमाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली  व गुरुपुत्र  नितीन भाऊ मोरे यांच्या  उपस्थितीत नृसिंहवाडी दत्तधाममध्ये सकाळी नऊ वाजता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये विद्येची व बुद्धीची देवता म्हणून  सरस्वती मातेस प्रथम स्थान दिले आहे. या सामूहिक सरस्वती पूजन सोहळ्यातून मुलांमध्ये भक्ती व मूल्यसंस्काराची शिकवण रुजवण्याचा विधायक हेतू या उपक्रमातून साध्य करण्यात येणार आहे. 

या उपक्रमात शालेय मुले, युवा-युवती आणि पालक एकत्रितपणे सामुहिक पद्धतीने सरस्वती मातेचे पूजन करणार आहेत.  बालसंस्कार विभागाच्यावतीने विविध उपक्रमातून व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, पर्यावरणजनजागृती, गडकिल्ले संवर्धन अशा अनेक विषयांवर सामाजिक प्रबोधन करण्यात येते. सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील सेवेकर्‍यांसाठी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाम मध्ये सकाळी नऊपासुन या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सरस्वती पुजनास येताना पंचोपचार पुजन साहित्य,अष्टगंध,अक्षता,हळद-कुंकु,फुले,तुळशीपत्र,खडीसाखर, ताम्हण,पळी,पेला,आसन, नित्यसेवाग्रंथ,अद्यावत श्री विद्या सरस्वती पुजन संच,पाणी बाॅटल असे साहित्य आणावयाचे आहे. सोहळ्यासाठी विनामुल्य प्रवेश असुन विद्यार्थी,युवक-युवती,पालक अशा सर्वासाठी हा सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. तरी याचा सर्व भाविक,सेवेकर्‍यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.




थोडे नवीन जरा जुने