यड्राव / शिवार न्यूज नेटवर्क :
यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील ४ विद्यार्थ्यांची अलोहा टेकनॉलॉजी लि. पुणे या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. यामध्ये जयेश गजरे, अदित्य वाकरेकर, अथर्व देशमुख, महंमदअली पटवेगार या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
अलोहा टेक्नॉलॉजी ही एक जागतिक आयटी सेवा आउटसोर्सिंग फर्म आहे. जी उत्पन्न वाढीसाठी तंत्रज्ञान विकसित करून आणि व्यवसाय कार्यक्षमता सुधारण्यासाठी डिजिटल परिवर्तन प्रदान करते. अलोहा टेक्नॉलॉजी जगभरातील उद्योगांना त्यांचे सध्याचे कार्य कार्यक्षमता किफायतशीर बनवून विकसित करण्यास सक्षम करते. भारतातील १६ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आणि ३ विकास केंद्रांसह, अलोहा टेक्नॉलॉजी ही माहिती तंत्रज्ञान सेवा देणारी आघाडीची कंपनी आहे.
कंपनी कमुयनिकेशन, बँकिंग, ट्रॅव्हल, हॉस्पिटालिटी, रिटेल, उत्पादन या क्षेत्रात काम करते. कंपनी आशिया, अफ्रिका, युरोप, ऑस्ट्रिला या खंडात काम करते. भारतातील १००० पेक्षा अधिक इंजिनिअर काम करीत आहेत.
महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल अॅप्टीट्युड ट्रेनिंग, टेक्ऩिकल स्कीलचे वेगळे प्रशिक्षण तसेच मॉक इंटरव्ह्यु यासह टेक्निकल सेशन, व्हॅल्यू अॅडेड प्रोग्रॅम, कंपनी स्पेसीपीक ट्रेनिंग, अद्यावत तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील व इंडस्ट्री क्षेत्रातील तंज्ञामार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबविले जातात. प्रोजेक्ट बेस लर्निंग अंतर्गत विद्यार्थ्यांना दुस-या वर्षापासूनच प्रोजेक्ट दिला जातो. या सर्वाचा फायदा विद्यार्थ्यांना झाला.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेलचे प्रा. नेहा सोनी, प्रा. अभिजित केकरे यांच्यासह सर्व डिन, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
