Top News

उत्तरकार्य दिवशी गरजू, निराधारांना अन्नदान करुन कसबा बावडा येथील एकनाथ कांबळे कुटुंबानी जोपासली सामाजिक बांधिलकी

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

             मूळचे शिरोली व सध्या कोल्हापूर कसबा बावडा येथील रहिवासी एकनाथ कांबळे यांच्या पत्नीचे अकस्मित निधन झाले होते. उत्तर कार्य दिवशी इतर खर्चाला फाटा देत दोनशे गरजू व गरीब लोकांना अन्नदान वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

   कै.जयश्री कांबळे या खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या. एक निरागस,शांत स्वभावाने त्यांनी अनेकांना आपलेसे केले होते.दि.३० रोजी त्यांच्यावर काळाने झडप घातली . घरची करती महिला मरण पावल्या मुळे कांबळे कुटुंब हवाल दिल झाले होते.पती एकनाथ कांबळे तर मुलगा तेजस, मुलगी चारुशीला व गुड्डी, आई वीना पोरके झाले होते.आई गेल्याचे दुःख होतेच. पण आईची आठवण म्हणून उत्तरकार्य दिवशी सामाजिक भान आणि अन्नदान हेच श्रेष्ठदान मानून कोल्हापूर मधील गरजू व निराधार बेघर,अनाथसाठी अन्नदान करणाऱ्या कोल्हापूर थाळी सीपीआर चौक येथे २०० लोकांना अन्नदान केले. त्यांचा हा उपक्रम पुरोगामी कोल्हापूरला साजेशा ठरला आहे.               

थोडे नवीन जरा जुने