शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
हसुर ( ता शिरोळ ) येथील अविकुमार आप्पासो पाटील (वय वर्षे ३८ ) यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी , मुलगा, मुलगी असा परिवार आहे, रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी ८ वाजता हसुर येथे होणार आहे, अरिहंत शुगर इंडस्ट्रीज (जैनापुर ) मधील आप्पासो (सागर) बाळगोडा पाटील यांचा तो मुलगा होता. मयत अविकुमार हा मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने त्याच्या निधनाने हसुर गावात हळहळ व्यक्त होत आहे,
