Top News

ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना केंद्रबिंदू मानून शेतकरी हिताचे कामकाज होत आहे - गणपतराव पाटील



हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरढोण येथील महादेव मंदिर मध्ये श्री.दत्त साखर कारखाना लि. शिरूरच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने सभासदांशी संवाद साधत असताना माननीय दत्त कारखान्याचे चेअरमन यांनी दत्त कारखान्याच्या माध्यमातून साखर कारखाना चालवत असता आमच्यावर कायम स्वरूपी विश्वास ठेवून आम्हाला विधस्त केले आहे व त्यांचे आम्ही तंतोतंत पालन करून सभासदांचे हितासाठी दवाखाना चालू करून अल्प दरात आजारी माणसांचे देखभाल केली जाते. सभासदांच्या व कारखान्याच्या परिसरातील सर्व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कॉलेज आवरून क्षणाची व कोर्सेस पूर्ण करून त्यांच्या नोकरीची रोजी रोटी ची व्यवस्था शक्य होईल तेवढी जबाबदारणे पूर्ण केली जाते. 

उत्पादक सभासदांना त्यांच्या शेअर्स पोटी 100 किलो साखर दिली जाते त्यामुळे शेअर्स रकमेपोटी किमान वीस ते बावीस टक्के पर्यंत बोनस स्वरूपात फायदा होतो. शेतकऱ्यांच्या हितासाठी माती परीक्षण पाणी परीक्षण पिकाच्या पानाची परीक्षा करून जमिनीत पीक वाढीसाठी कोणत्या अन्नद्रव्याची गरज आहे हे सभासदांना मोफत विना मोबदला तपासून रिपोर्ट दिला जातो. क्षारपड जमिनीच्या शार कमी होऊन पिक उत्पादनासाठी जमीन सुधारणा योजनेतून सच्छिद्र योजना राबवून क्षारपड जमिनीतून चांगले पीक घेता येते हे सिद्ध करून दाखविले आहेत म्हणून शेतकऱ्यांच्या आमच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे नमूद केली.

सदर प्रसंगी सुरुवातीला गणपतराव दादांच्या हस्ते महादेव मंदिरातील पिंडीला व सारे पाटील यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक महादेव पाणदारे केले. स्वागत सुरेश कोरे यांनी केले. अविनाश पाटील विश्वास बालिघाटे सुरेश सासणे दिलीप कोळी,बापुसो कोरे, विकास कांबळे,तानाजी कोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

विकास कांबळे जिल्हा परिषद सदस्य म्हणाले श्री.दत्त साखर कारखाना म्हणजे शिरोळ तालुक्यातील गंगोत्री असुन कारखान्याच्या माध्यमातून कर्नाटक व महाराष्ट्रातील सभासदांचे हित जोपासले जात असल्याचे नमूद केले. 

संवाद सभेसाठी दत्त कारखान्याची संचालक शेखर पाटील डॉक्टर रजपूत माजी सरपंच धरणगुत्ती मनोहर माळी तसेच शिरढोणचे सरपंच बाबासो हेरवाडे डे. सरपंच शक्ती पाटील दादा मालगाव रावसो यमकनमर्डे आप्पासो सूर्यवंशी तसेच शिरडून व परिसरातील सभासद हजर होते. सर्व सभेचे नियोजन कलाप्पा टाकवडे महादेव पाणदारे मनोहर शिरसे मायाप्पा पाणदारे आप्पासो पाणदारे प्रशांत मुजगोंडा दिलीप कांबळे विलास पाटील यांनी केले सभेचे अध्यक्षस्थानी कल्लाप्पा चौगुले शिवमुर्ती होते आभार महादेव पाणदारे यांनी मांडले.


थोडे नवीन जरा जुने