Top News

लागोपाठ येणाऱ्या महापुरावर शासनाने तातडीने उपाय शोधावा : धनाजी चुडमुंगे


दानोळी / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यासह सांगली कोल्हापूर मध्ये येणारा महापूर हा मानवनिर्मित आहे तो महापूर मानवी प्रयत्नांद्वारे रोखता येऊ शकतो पण सरकार त्याबाबतीत गंभीर नाही. लागोपाठ येणाऱ्या महापुरावर शासनाने कायमस्वरूपी उपाय शोधून या भागाला महापुरापासून कायमची मुक्ती द्यावी या मागणीसाठी 16 जून रोजी पूर परिषद घेत आहोत या पूर परिषदेला कवठेसार ग्रामस्थांनी यावे असे आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी केले.

नृसिंहवाडी येथे आंदोलन अंकुश च्या वतीने 3 री पूर परिषद होणार आहे त्या पूर परिषदेच्या निमित्ताने  शिरोळ तालुक्यातील पूर बाधित गावात धनाजी चुडमुंगे पूर मुक्ती जण संवाद यात्रा काढणार आहेत त्याची सुरुवात आज कवठेसार मधून झाली येथील स्टँड चौकात झालेल्या सभेत ते पुढे म्हणाले, दरवर्षी पावसाळा आला की पूर येईल का, आला तर किती येईल या भीतीने येथील जनतेला तीन महिने रात्रीची झोप लागत नाही.शासकीय पातळीवर पूर आल्यावर काय करायचे याचे नियोजन सुरु आहे पण जर धरणातील पाणी साठा व विसर्ग याचे योग्य नियोजन केल्यास आणि नदीपात्रातील अडथळे दूर करून महापूरावर नियंत्रण आनावे असे सरकारला वाटत नाही.सरकार चे डोळे उघडण्यासाठी आणि जनतेचा आक्रोश सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पूर परिषद घेत आहोत. या पूर परिषदेला सर्वांनी मोठया संख्येने यावे असे त्यांनी पुन्हा आवाहन केले.

कवठेसार मधील नागरिकांना पूर परिस्थिती निर्माण झाल्यास बाहेर पडण्यासाठी गावाच्या दक्षिणेला असलेला रस्ता गेले 20 वर्ष अनेकांनी आश्वासन देऊन पण चालू केलेला नाही तो रस्ता चालू करण्यासाठी येत्या महिन्यात आंदोलनाच्या रेट्यातून सुरु करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी धनाजी चुडमुंगे यांनी जाहीर केले.

या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच बशीर फकीर होते स्वागत महालिंग पाटील यांनी केले. यावेळी दादूनशा फकीर, सुभाष पाटील, समीर फकीर, सचिन मगदुम, संदीप पाटील, अनिल यशवंत पाटील, रघुनाथ पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते तर शेवटी आभार रमेश मगदूम यांनी मानले.

थोडे नवीन जरा जुने