कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड शहर हद्दीतील जैन सांस्कृतिक हॉल लगत असलेल्या सई सावली हॉटेल समोर सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मद्यधुंद तरुणांनी महावितरण चा बोर्ड असलेली बोलेरो पिकअप बेफान चालवत जेवण करून हॉटेल बाहेर आलेल्या एका कुटुंबाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधन राखून संबंधित कुटुंब बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टाळला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी गाडीतील दोन मद्यधुंद अवस्थेत असलेल्या युवकांना चोप दिला व गाडीच्या मागे बसलेले तिघेजण पळून गेल्याचे समजते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, कुरुंदवाड येथील जैन सांस्कृतिक लगत असलेल्या सई सावली हॉटेल समोरून महावितरणचा बोर्ड लावलेली बलेरो पिकअप काही तरुणांनी बेफान चालवत रस्ता ओव्हरटेक करण्याच्या नादात समोर थांबलेल्या एका फॅमिलीच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. सदरची घटना लक्षात येताच कुटुंबाने प्रसंगावधान राखल्याने सर्वांचा जीव वाचला. ही घटना घडताच घटनास्थळी गर्दी झाली आणि बोलेरो पिकअपमध्ये असलेल्या मद्यधुंद दोन तरुणांना चांगलाच चोप दिला. नागरिक चोप देत असल्याचे समजतात मागे बसलेल्या तीन तरुणांनी इथून पळ काढला.
