Top News

न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ येथे पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा

 


शेडशाळ / शिवार न्यूज नेटवर्क :

न्यू इंग्लिश स्कूल शिरसाळ येथे पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक श्री. जमादार सर यांनी पर्यावरण दिन व वृक्षारोपण काळाची गरज आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आपल्या घरापासूनच याची सुरुवात झाली पाहिजे तरच आपल्या मनामध्ये पर्यावरणाबद्दल आस्था निर्माण होईल. यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे. जागतिक तापमान वाढीपासून जर आपले संरक्षण करायचे असेल तर आपण वृक्षारोपण करणे अत्यंत गरजेचे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन आपणही करूया व दुसरा नाही सांगूया. अशी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. तसेच विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले व शाळा परिसराची सफाई करण्यात आली यावेळी शालेय विद्यार्थी व शिक्षक हजर होते.

थोडे नवीन जरा जुने