कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
राजापूर ता.शिरोळ बंधाऱ्याचे सर्व बर्गे काढून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. २१ हजार क्यूसेक्सने पाण्याचा कर्नाटक राज्यात विसर्ग सुरू झाला आहे. बंधाऱ्याजवळ साडे अकरा फूट पाणी पातळी झाली आहे.
महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमेवर हा बंधारा असून पावसाने सुरवात केली आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने दोन दिवसांपूर्वी म्हैशाळ बंधारा पाण्याखाली गेला आहे.आठ हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.राजाराम बंधाऱ्यातून 2हजार,295 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदी प्रदूषित झाली असून कृष्णा नदीत पाणी मिसळत आहे. पंचगंगा नदी ही सध्या वाहती झालेली आहे.
राजापूर बंधाऱ्यातून जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने मासेमारी करणाऱ्या भोई यांच्या जाळ्या पाण्यात वाहत्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. पाणी सोडण्यात आल्याने राजापूर बंधाऱ्यापलीकडील खिद्रापूर पर्यंत कोरडे पडलेल्या पाण्याने तुडुंब भरले आहे.
