Top News

निपाणी तालुका पूरस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज

पुरपरिस्थिती हातळण्यासाठी तालुक्यातील २५ गावांसाठी १४ नोडल अधिकाऱ्यांनी नेमणूक

अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

     केरळ सह कर्नाटकात मान्सून दाखल झाला आहे.मान्सूनसह अतिवृष्टी काळात निपाणी तालुक्यातील पूर आणि आपत्ती परिस्थिती नियंत्रणासाठी तहसील प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून २५ गावांसाठी १४ नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे, अशी माहीती तहसीलदार एम. एन. बळीगार यांनी दिली. अनेकांचे जीवनदान ठरलेल्या काळमावडी धारणा अंतर्गत येणाऱ्या निपाणी तालुका हा वेदगंगा आणि दूधगंगा नदीकाठावर वसलेले असून येथे मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवते. परिणामी नदीकाठासह तालुक्यातील अनेक गावे पाण्यात बुडतात. तर 

अनेक गावांना पुराचा वेढा बसतो. गतवर्षी अल्प पावसामुळे पूरस्थिती नव्हती, पण यंदा अधिक पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला जात आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने पूरस्थिती नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

           तालुक्यातील नोडल अधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांचे पथक बनविण्यात आले असून पूरस्थितीवर सर्वांनी लक्ष ठेवून परिस्थिती निवारणाच्या सूचना दिल्या आहेत.गावनिहाय नेमलेले नोडल अधिकारी या प्रमाणे-1)शिरदवाड, बोरगाव साठी,बोरगाव नगरपंचायत आयुक्त, 2)माणकापूर, कारदगा- ए.एस. पुजारी, 3)भोज, कुन्नूर-जयकुमार कंकणवाडे, 4)बेडकिहाळ, ममदापूर के एल- एम.ए. महाजन,5) मांगूर, बारवाड-सुदिप चौगला, 6)हुन्नरगी, सिदनाळ-राजगोंडा कागे,7) कोगनोळी, सुळगाव-संपतकुमार कुरणे, 8)यमगर्णी, बुदिहाळ चंद्रकांत गुडण्णावर,9), भाटनांगनूर, कुर्ली चंद्रकांत नंदगावी, 10)कोडणी-जगदीश हुलगेज्जी, 11)अकोळ, जत्राट- महांतेश हारोली, 12)नांगनूर-चंद्र चौगला, 13) भिवशी-एस.एस मुल्ला. *. शासकीय अधिकारी यंदाच्या पुर परिस्थिती साठी नेमण्यात आले असल्याची माहिती निपाणीचे तहसीलदार एम एन बळीगार दिली आहे.            

थोडे नवीन जरा जुने