शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून महाराष्ट्रात पूर परिस्थिती येऊ नये याची काळजी घ्यावी म्हणून अलमट्टी धरण प्राधिकरणाच्या डॅम इन्चार्ज श्री. आर एन हजेरी यांची काल आलमट्टी धरणावर जाऊन भेट घेतली यावेळी रमण गौड हलूर, रविचंद्र ई रावल हे धरण प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
त्याचबरोबर या मार्गदर्शक सूचना पावसाळ्याच्या काळात पाळल्या नाहीत आणि अनियंत्रित पाणी साठा करून महाराष्ट्रात महापूर आला आणि नुकसान झाल्यास आपल्याला जबाबदार धरून झालेले संपूर्ण नुकसान आपल्या कडून वसुल करून घेतले जाईल असंही त्यांना सांगण्यात आले आहे.
आंदोलन अंकुश व सांगलीची कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे शिष्टमंडळ आलमट्टी धरणावर जाऊन अधिकाऱ्याशी यावर्षी च्या पूर नियंत्रण करण्याच्या बाबतीत चर्चा केली. या शिष्टमंडळात जल तज्ञ् विजय कुमार दिवाण प्रभाकर केंगार प्रदीप वायचळ सर्जेराव पवार आंदोलन अंकुश चे दत्तात्रय जगदाळे बंटी माळी आनंद भातमारे बाळासाहेब भोगावे संभाजी माने संजय कोरे प्रदीप हावळ हे समाविष्ट होते.
