कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे म्हणणाऱ्या साने गुरुजींच्या जीवनामध्ये अनेक संघर्षाचे प्रसंग आले तरीही त्यांनी आपल्या आईच्या संस्काराच्या शिदोरीच्या आधारे सर्व संकटे पार केली.साऱ्या जगाला आईचे महात्म्य श्यामची आई या पुस्तकाद्वारे पटवून दिले.आईचे प्रेम त्यांनी सदैव आपल्या आचरणातून दाखवून दिले.असे मुख्याध्यापिका माणिक नागावे यांनी सांगितले,साने गुरुजींच्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडीलांचा मान-सन्मान करा, त्यांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करा असे आवाहन केले.साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले.सहाय्यक शिक्षक संतोष माने यांनी साने गुरुजींच्या जीवनातील शैक्षणिक व सामाजिक प्रसंग सांगून साने गुरुजींचे महत्त्व पटवून दिले.त्याचप्रमाणे विद्यालयातील विद्यार्थीनीं कुमारी रुश्दा पाटील व अनुष्का शिरढोणे यांची भाषणे झाली. सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन श्री रियाज जमादार यांनी केले.यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
