Top News

दत्त कारखान्याच्या अपघाती मृत सभासदांच्या वारसांना विम्याचे धनादेश वितरण



शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : 

दत्त साखर कारखान्याने नेहमीच सभासद आणि कामगार बंधूचे हित जोपासण्याचे काम केले आहे. सभासदांचा कारखान्याच्यावतीने विमा उतरवण्यात आला असून, अपघातात मृत्यू झालेल्या तसेच कारखान्याचे सभासद - रावसाहेब गुंडू चव्हाण, वय - 60 वर्षे (रा. घोसारवाड ) यांचा मागून आलेल्या भरदाव ट्रकने धडक दिलेने ते ट्रॅकच्या मागील चाकात सापडून त्यांचा मृत्यू झाला.

तसेच झाकीर सरवार पटेल, वय - 60 वर्षे (रा. औरवाड ) यांचा ते त्यांच्या मोटारसायकल वरून औरवाड कडे येत असताना मागून येणाऱ्या ट्रॅक्टर ने ठोकरलेने रस्त्यात पडलेने मृत्यू झाला. मृत व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये चा न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा धनादेश देणेत आला.  

     तसेच सदरचे अपघाती मृत्यूदावे मिळवून देण्यासाठी चीप लाईफ इन्शुरन्स अॅडव्हायजर श्री एकनाथ पाटील यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. दत्त कारखाना नेहमीच सभासद व कामगाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे प्रतिपादन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केले.

शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सभासद बंधूच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व सभासदांचा अपघाती विमा उतरविण्यात आला आहे. पॉलिसी अंतर्गत मृत सभासदांच्या वारसांना लाभ देण्यात आला आहे. यासाठी कोल्हापूर चे क्लेम मॅनेजर - रसिका कुलकर्णी, डिव्हिजन मॅनेजर - उमेश उपाध्ये,न्यू इंडिया कोल्हापूर असिस्टंट क्लेम मॅनेजर - सिद्धिता कोळमकर, रश्मी पिसाळ , इचलकरंजी चे डिव्हिजन मॅनेजर - वसंत कोल्हे, शुभम कदम, अरविंद कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. अपघाती मृत्यू झालेल्या कारखान्याच्या सभासदांच्या वारसांना विमा कंपनीचे धनादेश कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील,फायनान्स मॅनेजर संजय भोसले, श्री. परवेज मेस्त्री, दत्त कारखाना कामगार संचालक श्री.बाळासाहेब बनगे आदी उपस्थित होते. तर आज अखेर श्री दत्त शेतकरी सह. साखर कारखान्याच्या वतीने सभासदांना आज अखेर 89 अपघाती मयत सभासदांच्या वारसांना 89 लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत.

थोडे नवीन जरा जुने