Top News

बांबरवाडी,दत्तवाड येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात



इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :

 विद्या मंदिर बांबरवाडी,दत्तवाड येथे २०२४-२५ च्या शैक्षणिक सत्रातील पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न झाला.

       मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे यांनी प्रवेशोत्सव उपक्रम व शाळेच्या प्रगतीबाबत माहिती दिली.शाळेच्या पटवाढीबाबत प्रयत्न केलेल्या व शाळेप्रती विश्वास दाखविलेबद्दल पालकांचे आभार मानले.

         दत्तवाड ग्रामपंचायतीचे सदस्य बाबूराव पोवार,सीमा प्रमोद पाटील,पांडुरंग चव्हाण,दिनकर चव्हाण,दिलीप चव्हाण यांचे शुभहस्ते पाठयपुस्तके,चॉकलेट,पुष्प देवून नवागतांचे स्वागत करण्यात आले.

          सर्व मुलांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.याप्रसंगी प्रमोद पाटील,दिलीपकुमार कुरुंदवाडे,अर्चना चव्हाण, नामदेव चव्हाण,रेखा चव्हाण, भाग्यश्री कांबळे,रमेश चव्हाण,महेश चव्हाण,स्मिता धोंड,आण्णासो पोवार उपस्थित होते.अध्यापिका सरिता राजमाने यांनी आभार मानले.

थोडे नवीन जरा जुने