Top News

कन्या विद्या मंदिर शिरढोणचे शैक्षणिक उपक्रम आदर्शवत: डॉ कुमार पाटील



हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क : 

कन्या विद्या मंदिर शिरढोण ही शाळा जिल्हा परिषदेची असुनही मुख्याध्यापक श्री बंडगर सर इतर सर्व शिक्षक स्टाफ ला सोबत घेऊन विविध शैक्षणिक, साहित्यिक,आध्यात्मिक, सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवतात व विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्कारक्षम बनवण्यासाठी कार्यरत असतात त्यामुळे कन्या विद्या मंदिर शिरढोणचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा व इतर क्षेत्रात आघाडीवर आहेत याचा इतरांनी आदर्श घ्यावा असे गौरवोद्गार श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना ट्रस्ट संचलित श्री दत्त मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल शिरोळचे वैद्यकीय अधिकारी डॉ कुमार पाटील यांनी काढले. ते कन्या विद्या मंदिर शिरढोण येथे शाळेच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५च्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. व्यासपिठावर अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका सौ पुजारी मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री बाबासो मालगावे यांच्यासह शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक विठू बंडगर सर यांनी केले.आपल्या मनोगतात डॉ कुमार पाटील यांनी मुलांना कोणताही न्यूनगंड मनात न बाळगता मुलांनी शाळेत प्रवेश घेऊन शैक्षणिक प्रगती करुन आपल्या शाळेचे,गावाचे नाव मोठे करावे अशा शब्दात शुभेच्छा देऊन शाळेसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.ग्रामपंचायत सदस्या व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ तेजस्विनी कुमार पाटील यांच्या व साहित्य परिषद बहुद्देशीय समितीचे सचिव डॉ कुमार पाटील यांच्या वतीने गेली ५ वर्षे शाळेत प्रवेश करणाऱ्या पहिलीच्या मुलांना अंकलिपी वाटप करण्यात येतात. यावर्षीही अंकलिपी वाटप अध्यक्ष व इतरांच्या हस्ते करण्यात आले.त्याचबरोबर शासनाच्या वतीने पुस्तके वाटप करण्यात आली. शिक्षकांच्या वतीने खाऊ वाटण्यात आले. गुलाबपुष्प देण्यात आले.फुगे लावुन वर्ग शाळा सजवण्यात आले होते जेणेकरुन नवागत विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश आनंददायी व उत्साही व्हावा. अशा प्रकारे कन्या विद्या मंदिर शिरढोण येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

    कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक विठू बंडगर, शांतीनाथ इंगळे,चुडाप्पा, पुंडलिक नाईक सर,श्रीम.भावसार मॅडम,दळवी सर,श्रीम.कोठावळे मॅडम,सौ.यादव मॅडम यांच्यासह कांबळे काका यांनी परिश्रम घेतले.यावेळी विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.आभार प्रदर्शन श्री बंडगर सर यांनी केले.

थोडे नवीन जरा जुने