शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
सन २०२४- २०२५या शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५जून२०२४ रोजी शाळा प्रवेशोत्सव उपक्रमाने संपन्न झाली.
नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम दिनी सडा शिंपून रांगोळी काढून व तोरण बांधण्यात आले होते.नवागतांचे चॉकलेट,फुगे व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठयपुस्तके वितरीत करण्यात येवून मिष्ठान्न भोजनाचा आस्वाद देण्यात आला.जिल्हा परिषदेच्या १५३तर जयसिंगपूर नगर पालिकेच्या १० शाळांमध्ये हा उपक्रम राबविणेत आला.
कोल्हापूर जिल्हा परिषद व शिरोळ पंचायत समितीचे अधिकारी शाळेच्या प्रथम दिनी भेटी देवून शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देवून मार्गदर्शन केले. गट शिक्षण अधिकारी भारती कोळी यांनी राजर्षि शाहू विद्या मंदिर नं.१व विद्या मंदिर नृसिंहवाडी या ठिकाणी भेट देवून मार्गदर्शन केले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी दाखलपात्र बालकांची १०० टक्के पटनोंदणी होण्यासाठी प्रभातफेरी,घोषवाक्ये, पथनाटये,शाळांची जाहिरात, गृहभेटी,संपर्क मोहिम इत्यादीद्वारे पूर्वतयारी करुन शाळा प्रवेशोत्सव यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी,प्रतिष्ठीत नागरिक,शाळा व्यवस्थापनाचे पदाधिकारी,मुख्याध्यापक, शिक्षक यांचे मोलाचे योगदान लाभले.
शिरोळ तालुक्यात एकूण दाखलपात्र मुले -१८६७ मुली१७८४ एकूण ३६५१ अशी संख्या होती. त्यापैकी जिल्हा परिषद व नगरपालिका शाळेत ११५८मुले,११७६ मुली अशी एकूण २३३४ दाखल झाली आहेत.सर्वेक्षणातील अन्यत्र दाखल ४३८ मुले,३९८ मुली अशी एकूण ८३६ संख्या आहे.
शिरोळ तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील असून लोकप्रतिनिधी व शिक्षकांनी योगदान देण्याचे आवाहन गट विकास अधिकारी नारायण घोलप यांनी केले.
दरम्यान गट शिक्षण अधिकारी भारती कोळी म्हणाल्या की जिल्हा परिषदेच्या शाळांच्या भौतिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे प्रवेशाचा कल वाढलेला दिसून येत आहे.

