अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
चोरट्यांनी बंद घरे, दुचाकी गाड्या, किरकोळ वस्तू चोरी बरोबरच आता चक्क मंदिरातील दानपेट्टीवर हात मारण्यास सुरू केले आहेत ,चोरटे मंदिरातील दानपेट्या फोडून त्यातील रक्कम चोरून घेवून जाण्यास घाबरत नसल्याचे दिसून येत आहे. काल कारदगा येथील खडी माळावर असलेल्या श्री सदगुरू बाळूमामा मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की कारदगा गावापासून ४ किलो मिटर अंतरावर लक्ष्मी दड्डीतोट पासून १ किलो मिटर अंतरावर सदगुरू बाळूमामा मंदिर असून या मंदिर आवारात प्रती अमावस्येला अभिषेक, प्रवचन, भजन व महाप्रसाद वाटप असा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमाला कारदगासह बारवाड, मांगुर, यळगुड, रेंदाळ, ढोणेवाडी, भोज, कुन्नुर येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थितीती लावतात.
या मंदिर आवारात सदगुरू बाळूमामांच्या बकऱ्यांचे आठ दिवस वास्तव्य होते. या बकऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविकांनी एकच गर्दी केली होती. आठ दिवस या बकऱ्यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ही बकरी दि.१२ जून रोजी दुसरीकडे सकाळी प्रयाण केली. याच दिवशी रात्री काही अज्ञात चोरट्यांनी या मंदिर आवारात असलेली दानपेटी फोडून यातील असलेली रक्कम लंपास केली आहे. मंदिरातील दान पेट्याही जर सुरक्षित रहात नसतील तर मंदिर परिसर कसा सुरक्षित राहणार असे भाविकातून चर्चा केली जात आहे. सद्या भुरट्या चोऱ्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याने या चोरांचा बंदोबस्त पोलिसांनी करणे गरजेचे आहे.
