शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
मासिक इंद्रधनुष्य व साहित्य सहयोग दीपावली यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. आ. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील स्मृती अ. भा. मराठी कथा स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. कथा स्पर्धेचे हे ९ वे वर्ष असून प्रामुख्याने नवोदित कथाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येते.
पहिले बक्षीस रु.३०००/- मानपत्र व स्मृतीचिन्ह, दुसरे बक्षीस रु. २०००/- मानपत्र व स्मृतीचिन्ह, तिसरे बक्षीस रु.१०००/- मानपत्र व स्मृतीचिन्ह आणि उत्तेजनार्थ ३ बक्षीसे रु. ५००/- मानपत्र व स्मृतीचिन्ह अशी बक्षीसे देण्यात येणार असल्याची माहिती मासिक इंद्रधनुष्यचे कार्यकारी संपादक डॉ. मोहन पाटील व साहित्य सहयोगचे संपादक सुनील इनामदार यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले,
१) लेखकांनी आपल्या कथा पोष्टाने किंवा ई मेलने (श्रीलिपी किंवा युनिकोड, पी.डी.एफ. )
खाली दिलेल्या पत्यावर ३१ ऑगस्ट २०२४ पूर्वी पाठवाव्यात. २) कथे साठी विषयांचे बंधन नाही. ३) परिक्षकांचा निकाल अंतीम राहील. ४) विजेत्यांना निकाल कळविण्यात येईल व वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात येईल. ५) विजेत्या व अन्य निवडक कथा साहित्य सहयोग दिवाळी अंकात प्रकाशित होतील. ६) शब्द मर्यादा २००० शब्दांपर्यंत आहे.
कथा पाठविण्याचा पत्ता - सुनील इनामदार, संपादक - साहित्य सहयोग दीपावली, ५४७५, समतानगर, मु.पो. शिरोळ ता. शिरोळ, जि. कोल्हापूर, पिन - ४१६ १०२, मोबा. नं. ९८५०२४७७६७ किंवा Email - sahityasahayog@gmail.com वर पाठवावे, असे आवाहन डॉ. मोहन
पाटील व सुनील इनामदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
