Top News

टाकवडे च्या शौर्य कळसापनावर याची इस्त्रो सहलीसाठी निवड



हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :

     कुमार विद्या मंदिर टाकवडे ता.शिरोळ येथील इयत्ता तिसरीतील विद्यार्थी शौर्य सरदार कळसापनावर याने भारत टॅलेंट सर्च एक्झाम २०२४ या परीक्षेत महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावून इस्त्रो सहलीसाठी निवड झाली आहे. त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी ही गुणवत्तेमध्ये कमी नाहीत हे शौर्य ने दाखवून दिले आहे.

           गट शिक्षण अधिकारी भारती कोळी,विस्तार अधिकारी दिपक कामत,केंद्र प्रमुख प्रकाश खोत,मुख्याध्यापक अरुण कदम,पालक भाग्यश्री व सरदार कळसापनावर यांचे प्रोत्साहन लाभले तर वर्गशिक्षिका अर्पणा परीट मॅडम व सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

थोडे नवीन जरा जुने