Top News

३१ वर्षांनी मिळाल्या जुन्या आठवणींना उजाळा



कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

कुरुंदवाड येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सौ. विमलादेवी खंडेराव माने कन्या माध्यमिक विद्यालय मधील माजी विद्यार्थीनींचा स्नेह मेळावा रविवार दिनांक ९जून रोजी बालाजी मंगल कार्यालय, कुरुंदवाड येथे आयोजित केला होता.या स्नेह मेळाव्यास जवळजवळ ४० माजी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.स्नेह मेळावा खूप आनंदात व उत्साहात साजरा झाला. विद्यार्थिनींच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. शाळेमध्ये मिळालेले संस्कार, मुली स्वतःच्या आयुष्यात त्याचा उपयोग कसा करून घेतात.हे सर्वच विद्यार्थिनींच्या मनोगतातून दिसून आले. वेगवेगळ्या शहरांमध्ये मुली राहत असल्यामुळे या निमित्ताने एकत्र येऊन सगळ्यांच्या गाठीभेटी होणं हाच या मुलींच्या साठी आनंदाचा क्षण होता.       

         स्नेह मेळाव्याचे नियोजन सौ.ज्योती बदामे बरगाले व सौ.स्वाती पाटील जाधव यांनी केले.त्याचबरोबर आजी -माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा सदर मेळावा संपन्न व्हावा यासाठी प्रयत्न केले.या स्नेहमेळाव्यास आजी माजी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.यामध्ये सौ.सुरेखा म्हैसकर,सौ.सुनीता पटवर्धन श्रीमती प्रभा कुलकर्णी,सौ. सुनीता कुलकर्णी,सौ.भाग्यश्री कुलकर्णी,श्रीमती स्नेहलता कोले,श्री.बदामे,श्री.नरुटे,श्री. नागावे,श्री.तराळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती पाटील हिने केले तर आभार ज्योती बरगाले हिने मानले. सर्वच विद्यार्थिनीं मनोगतातून व्यक्त झाल्या.विद्यार्थिनींच्या जडणघडणीमध्ये शाळेचा असलेला मोठा वाटा याबद्दल त्या कृतकृत्य होत्या व आनंद व्यक्त करत होत्या.विद्यार्थिनींनी सर्वांचे पुस्तके देऊन सत्कार केला.विद्यार्थिनींनी सर्वासाठी मिष्टान्न भोजनाचे नियोजन केले होते. कार्यक्रमाची सांगता आपल्या शाळेच्या प्रांगणात करत सर्वच विद्यार्थिनीं एक सकारात्मक ऊर्जा घेऊन गेल्या.

थोडे नवीन जरा जुने