हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
जायंटस् ग्रुप ऑफ दुर्गा सहेली,मौजे आगर यांनी ज्ञानगंगा हायस्कूल जयसिंगपूर या शाळेतील दहा गरजू विद्यार्थिनींना एका वर्षासाठी शैक्षणिक दत्तक घेतले आहे.
या विद्यार्थिनींना वर्षभरातील लागणारे सर्व साहित्य पुरविले आहे.त्यांच्या या सामाजिक बांधीलकीने गरजू मुलींना शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या उपक्रमासाठी डॉ.स्नेहल कुलकर्णी,संगीता जाधव, अनुराधा वेल्हाळ,नलिनी देसाई, श्रीमती प्रतिभा ढापरे,वीणा चव्हाण,गंगा ताशिलदार,आशा शहापुरे,रेखा पाटील,पूजा बदामे या सदस्यांनी आर्थिक सहकार्य केले.
या दत्तक योजनेसाठी लागणारा निधी ज्ञानगंगा हायस्कूल चे मुख्याध्यापक चावरे सर यांचेकडे सुपूर्द केला.त्या प्रसंगी ग्रुप अध्यक्षा अश्विनी नरूटे,जायंटस् फेड.समन्वयिका डॉ.स्नेहल कुलकर्णी,माजी अध्यक्षा संगीता जाधव,कुसुम जगदाळे,अनुराधा वेल्हाळ, उपाध्ये मॅडम,अमर पाटील तसेच शिक्षक उपस्थित होते.
