शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
.मुस्लिम धर्मातील पवित्र असा बकरी ईद हा सण शिरोळ शहर व परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने मुस्लिम धर्मियांच्यावतीने सामूहिक नमाज पठण व विश्वशांतीसाठी पार्थना करण्यात आली तर सर्व धर्मीय बांधवांनी मुस्लिम बांधवांना बकरी ईद निमित्त ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या.
बकरी ईद निमित्त येथील इदगाह मैदानावर शहरातील सर्व मुस्लिम बांधवांच्यावतीने सामूहिक नमाज पठण व विश्वशांतीसाठी पार्थना करण्यात आली हाफीज अमिर शेख, हाफीज इलियास बागसर, यांनी नमाजपठण करून विश्वशांतीसाठी पार्थना केली तसेच ईदगाह मैदान परिसर सुशोभीकरणाकरिता निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केलेले भाजपाचे शिरोळ तालुकाध्यक्ष मुकुंद उर्फ बाळासाहेब गावडे व काशीम उर्फ पिंटू शेख यांचे व निधी दिल्याबद्दल खासदार धैर्यशील माने यांचे मुस्लिम समाजाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.
शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील युवानेते पृथ्वीराजसिंह यादव माजी सरपंच गजानन संकपाळ माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील नरदेकर विजय आरगे आदींनी बकरी ईद निमित्त उपस्थित मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष सिकंदर बागसार कचेरी येथील मुस्लिम मज्जिदचे अध्यक्ष अस्लम शेख माजी उपसरपंच बाळासाहेब शेख माजी ग्रामपंचायत सदस्य परवेज मेस्त्री फत्तेलाल मेस्त्री मज्जिद अत्तार इम्रान कोठीवाले इम्रान अत्तार यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
