अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
कर्नाटक राज्यातील शाळांना 1 जून पासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झालेला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय सवलती बरोबर राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने चालू वर्षात विद्यार्थ्यांना सवलती पास देण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी बोरगाव सह परिसरातील विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर सवलतीचा बस पास कडावे असे आवाहन बोरगाव कंट्रोलर श्री इराणा रेड्डीयर यांनी केले.ते बोरगांव बस स्थानकात विद्यार्थ्याना पास वितरण करते वेळी सांगितले. *. बोरगाव हे निपाणी नंतर दोन नंबरचे मोठे शहर म्हणून नावारूपास आलेले आहे, बोरगाव हे सीमा भागातील एक अद्यावत शहर म्हणून ओळखले जात असून या ठिकाणी बोरगाव सह परिसरातील अनेक विद्यार्थी निपाणी ,चिकोडी,बेडकिहाळ, बेळगांव, ईचलकरांजी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी कॉलेजला जात असतात .त्यांना सवलतीचा लाभ घेता यावा यासाठी निपाणी नंतर बोरगांव या ठिकाणी पास देण्याची मंडळानी सोय केली आहे. *. बोरगांव बस स्थानकातून चालु शैक्षणीक वर्षात जवळपास 150 हुन अधिक विद्यार्थ्याना पास वितरण केले आहेत,याशिवाय कामगार,वयस्क पास यासाठी सर्व्हिस पास ची सोय केेली आहे.तरी सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन बोरगांव बस स्टँड कंट्रोलर इरान्ना रेडियर यानी केले आहे.यावेळी सहायक्क सुशांत किल्लेदार उपस्थीत होते.
