जलपर्णीच्या विळख्याने नदीपात्र झाकले प्रशासनाचे दुर्लक्ष नदी प्रदूषणात वाढ
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत आहे याकडे प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष कारणीभूत आहे अशातच शिरोळ येथील पंचगंगा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णीचा विळखा पडला असल्यामुळे पंचगंगा नदीपात्र म्हणजे जणू एक खेळाचे मैदानच बनले आहे यामुळे नदी प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून याचा धोका मानवी आरोग्याबरोबरच जलचर प्राण्यांवर होत आहे प्रशासनाने तात्काळ जलपर्णी काढण्याची मोहीम हाती घेऊन पंचगंगा नदी पात्र मोकळे करून प्रवाहित करावे अशी मागणी पंचगंगा नदी काठावरील जनतेतून होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला जीवनदायी ठरलेल्या पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न अत्यंत बिकट आणि गंभीर बनत चालला आहे पंचगंगेच्या प्रदूषित पाण्यामुळे मानवी व जलचर प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्याची कारवाई प्रशासन केवळ कागदोपत्रीच करत असते मात्र प्रदूषणाचा प्रश्न म्हणजे भिजत घोंगडे असाच म्हणावा लागेल पंचगंगा नदी पात्रात सातत्याने रासायनिक व केमिकलयुक्त सांडपाणी तसेच अनेक गावातील गटारीचे सांडपाणी मिसळत असल्यामुळे हे पाणी पिण्यास अयोग्य बनले आहे तरीही नाईलाजाने जनतेला हेच पाणी प्यावे लागते हा गंभीर प्रश्न तडीस नेण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन पंचगंगा नदी प्रदूषित मुक्त करण्यासाठी अनेक आंदोलने केली तरीही कागदी कारवाई करण्यातच प्रशासन धन्यता मानते प्रत्येक लोकप्रतिनिधीही पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्याचा शब्द देतो पण याबाबत ठोस कारवाई केली जात नाही त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.
पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न बिकट असताना पुन्हा एकदा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णीचा विळखा पडला आहे यामुळे शिरोळ येथील पंचगंगा नदी पात्र जणू काही खेळाचे मैदानच बनले आहे जलपर्णीमुळे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे तसेच याचा धोका मानवी व जलचर प्राण्यांच्या जीवनावर सातत्याने होत आहे गेल्या एक महिन्यापासून या नदीपात्रात जलपर्णीचा विळखा पडला आहे जलपर्णी काढण्याची मागणी नदीकाठावरील जनतेने सातत्याने केली तरीही प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे पुन्हा मोठ्या प्रमाणात जलपर्णी नदीपात्रात येत आहे याचा त्रास सर्वांना सहन करावा लागत आहे नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे त्यासाठी पहिल्यांदा पंचगंगेच्या पात्रातील जलपर्णी तात्काळ काढून घेऊन नदी प्रवाहित करावी व पंचगंगा प्रदूषण मुक्ती बाबत कायमस्वरूपी ठोस उपाययोजना राबविण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे तात्काळ जलपर्णी काढण्याची मोहीम हाती घ्यावी अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्याचा इशारा शिरोळ शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व विविध संघटनांनी दिला आहे निवडणुकीनंतर लवकरच पंचांगा प्रदूषण मुक्ती बाबत आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असे बोलले जात आहे त्यामुळे पंचगंगा प्रदूषणाच्या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
