प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
नवे दानवाड ता.शिरोळ येथे महायुतीचे हातकणंगले लोकसभेचे उमेदवार लोकप्रिय व अष्ठपैल खा धैर्यशील दादा माने यांचे जोरदार प्रचार सुरू करण्यात आला.
गावचे ग्रामदैवत अजनीपुत्र हनुमान यांच्या चरणी पुजारी गुरव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून चरणी सर्व कार्यकर्ते नतमस्तक होऊन गावातून हलगी वाजवत प्रत्येकांच्या घरी जाऊन खास धैर्यशील दादा माने यांना दोन नंबर बटण दाबून भरगोस मतदान करून विजयी करण्याचे विनंती केले.
या प्रसंगी नेते शिवगोंडा पाटील, ॲड. राहुलराज ह.कांबळे, मा.सरपंच प्रकाश परीट, उपसरपंच प्रशांत कांबळे, संजय परीट, मा.उपसरपंच पांडुरंग धनगर, दीपक वि.कांबळे,भरमगोंडा पाटील, मुताप्पा कांबळे, चंद्रकांत कांबळे, प्रकाश जाधव, विकी जाधव सह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थीत होते.
