Top News

लोकसभा निवडणुकीसाठी पोलीस कर्मचारी गृहरक्षक दल जवानांनी केले मतदान

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

हातकणंगले लोकसभा मतदार संघांतर्गत शिरोळ विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त असलेले पोलीस कर्मचारी गृहरक्षक दलाच्या जवानांनी रविवारी मतदान केले.

लोकसभा निवडणूक प्रक्रिया मंगळवार दिनांक 7 मे 2024 रोजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत असून हातकणंगले लोकसभा मतदार संघामधील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये मतदान प्रक्रिया होणार असून या मतदान प्रक्रियेसाठी सुरक्षित मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांची प्रत्येक मतदान केंद्रावर नियुक्ती केली आहे या मतदान प्रक्रियेसाठी मतदान अधिकारी ,कर्मचारी, पोलीस , गृहरक्षक दलाचे जवान मतदान साहित्य घेऊन उद्या सोमवारी सकाळी शिरोळ तहसीलदार कार्यालय येथून नियुक्त मतदान केंद्रावर जाणार आहेत सोमवार व मंगळवार या दोन्ही दिवस मतदान सुरळीतपणे पार पडण्यासाठी मतदान केंद्रावर कार्यरत असतात यासाठी त्यांची मतदान प्रक्रिया आज रविवारी पार पडली.

पोलीस आणि गृहरक्षक दलाच्या जवानांची शिरोळ प्रशासकीय इमारत येथे मतदान प्रक्रिया पार पडली. पोलीस आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी आपल्या पवित्र मतदानाचा हक्क बजावत असताना पसंतीच्या उमेदवाराला उत्साहाने मतदान केले ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

थोडे नवीन जरा जुने