Top News

मुन्ना,राजु कलावंत यांचे जावई जमीर वंजारी यांचे इचलकरंजीत अपघाती निधन

 


हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरढोण मधील सुप्रसिद्ध मुन्ना राजु हॉटेलचे मालक राजु कलावंत यांचे जावई आटपाडी येथील युवा सामाजीक कार्यकर्ते शांत, संयमी, हरहुन्नरी, सदाबहार व्यक्तीमत्व जमीर शब्बीर वंजारी वय ३५ यांचे इचलकरंजी येथे निधन झाले आटपाडी येथील शब्बीर कुतबुद्दीन वंजारी, मेहराज शब्बीर वंजारी यांचा परिवार वर्षापूर्वीच इचलकरंजी येथे वास्तव्यास गेला होता. या दाम्पत्याला एक मुलगा जमीर आणि एक मुलगी, सुन, भावजय चुलत बंधू, सुना असा परिवार आहे. बुधवारी मोटार सायकल वरून पत्नीसह जात असताना चक्कर आल्याने रस्त्याखाली गाडी जावून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या जमीर आणि त्याच्या पत्नीस उपचारासाठी हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी जमीर यांचे निधन झाले. इचलकरंजी येथील कागवाडे मळ्यातील मरकज मशिदीलगतच्या कबरस्थान मध्ये त्यांचे पार्थीव दफन करण्यात आले सोमवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा जियारतचा धार्मिक विधी मरकज मसजीद इचलकरंजी येथे करण्यात आले.विविध सण, उत्सव, सभा, समारंभात हिरीरीने सहभागी होणारे जमीर अजातशत्रु व्यक्तीमत्व होते. अतिशय मनमिळावू, स्वच्छ, पारदर्शक स्वभावाच्या जमीर यांचा आटपाडी शहरात मोठा मित्र परिवार आहे.त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.


थोडे नवीन जरा जुने