जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ शहरात मोकाट कुत्र्याच्या हल्यामुळे दहशत निर्माण झाली होती.शिरोळ पालिकेने शुक्रवारपासून मोकाट कुत्र्यावर निर्बीजीकरण व लसीकरण करण्याची मोहिम हाती घेतली आहे. दिवसभरात सांगली महालिकेचे कर्मचारी यांनी 12 कुत्री पकडून पशुवैद्यकीय डॉक्टराच्या ताब्यात दिले. डॉक्टारानी 12 कुत्र्यावर शस्त्रक्रिया व लसीकरण केले. त्यानंतर दोन दिवस देखरेखेखाली ठेवण्यात येणार आहे.
शिरोळ शहरात मोकाट कुत्र्याच्या झुंडी व हल्ल्याच्या घटनामुळे धहशत निर्माण झाली आहे. नागरीकांच्या मागणीनंतर पालिकेने मोकाट कुत्र्यांच्यावर कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शहरात सुमारे 600 ते 700 कुत्र्यांची संख्या असण्याची अंदाज असल्याने या सर्व कुत्र्याच्यावर निर्बीजीकरण व लसीकरण करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. शुक्रवारी सकाळी सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे कर्मचारी डॉग व्हॉन घेवून शिरोळ शहरात दाखल झाले. कर्मचार्यांनी शहरातील पालिका चौक, बसस्थानक या परीसरातील सुमारे 12 मोकाट कुत्री पकडून जयसिंगपूर येथील तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय यांच्या डॉक्टर पथकाकडे देण्यात आली.
त्यानंतर या 12 मोकाट कुत्र्यावर निर्बीजीकरणमध्ये नर कुत्र्याची नसबंदी तर मादी कुत्र्याना पिल्ली होवू नयेत म्हणून शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच लसीकरणही करण्यात आले. तर निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात आलेल्या कुत्र्याच्या कानावर खुन करण्यात आली आहे. तसेच त्यांना दोन दिवस रेखरेखेखाली ठेवण्यात येणार आहे. शिरोळ पालिकेने पुढाकार घेवून निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात आल्याने नागरीकांतून समाधान व्यक्त होत आहे. शिरोळ शहरात प्रत्येक शुक्रवारी ही मोहिम राबविण्यात येणार आहे.
.
