Top News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) गटाच्या शिरोळ तालुका अल्पसंख्यांक विभागाच्या शिरोळ तालुकाध्यक्षपदी दस्तगिर जमादार

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

       राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) गटाच्या शिरोळ तालुका अल्पसंख्यांक विभागाच्या शिरोळ तालुकाध्यक्षपदी दस्तगिर जमादार यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष महंमद महात यांनी निवडीचे पत्र दिले.

           शरद पवार गटाकडून शिरोळ तालुक्यातील पक्षवाढीसाठी मोर्चे-बांधणीला वेग आला आहे.दस्तगिर जमादार यांच्या कार्याचा लेखा-जोखा पाहून अल्पसंख्यांक विभागाच्या तालुकाध्यक्ष पदासाठी  जमादार यांची निवड करण्यात आली.

       यावेळी बोलताना नूतन तालुकाध्यक्ष जमादार  म्हणाले गोरगरीब जनतेला या पदाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे कार्य करून पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी माझा प्रयत्न राहील.अल्पसंख्याकमध्ये येणाऱ्या सर्व घटकांना त्यांच्या असणाऱ्या पूर्ण करण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून कार्य करत राहू असे सांगितले.

      यावेळी जिल्हा सरचिटणीस उमेश पाटील,शिरोळ विधानसभा कार्यक्षेत्र अध्यक्ष बबलू पवार,शहराध्यक्ष तानाजी आलासे,हरून म्हतापे,आण्णाप्पा आवळे,बशीर कोठीवाले, राजमहमंद गरगरे,दिलीप बंडगर,महेश आलासे,सर्जेराव बागडी,गणेश आलासे आदी उपस्थित होते.



थोडे नवीन जरा जुने