शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ येथील पंचगंगा नदीमध्ये प्रदूषित पाणी आल्याने हजारो मासे व जलचर प्राणी मृत्यूमुखी पडले आहेत यामुळे त्या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे तसेच पंचगंगेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून याकडे प्रदूषण महामंडळाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याने जनतेतून तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसापासून पंचगंगा नदी पात्रात दुर्गंधीयुक्त रासायनिक सांडपाणी व मैलामिश्रित पाणी मिसळत आहे सदरचे पाणी विषारी युक्त बनले आहे याचा परिणाम जलचर प्राण्यांवर होत असून मोठ्या प्रमाणात मासे मृत्यूमुखी पडत आहे तसेच अनेक जलचर प्राणी दगावले आहेत त्यामुळे सदरचे पाणी हे पिण्यास अयोग्यच बनले आहे तरीही प्रदूषण महामंडळाने याकडे दुर्लक्ष केले आहे हे पाणी पिऊन माणसे मेल्यानंतरच प्रदूषण महामंडळ कारवाई करणार का असा संतप्त सवाल जनतेतून व्यक्त होत आहे.
पंचांगा नदीपात्रात मृत माशांचा पडलेला खच आणि काळेकुटृ पाण्याला आलेली दुर्गंधी यामुळे परिसरातील मानवी आरोग्य धोक्यात आले आहे बुधवारी सकाळपासून शिरोळ ,कुरुंदवाड बंधाऱ्यावर मासे पकडणाऱ्यांची झुंबड उडाली होती काळे कुंट, फेसयुक्त दूषित पाणी आल्याने माशांना पाण्यामध्ये ऑक्सिजन मिळत नसल्याने मासे पाण्याबाहेर ऑक्सीजन घेण्यासाठी येत असताना दिसत होते यावेळी मासेमारी करणारे लोक सहज हाताने मासे गोळा करत होते मिळालेले मासे मोतीच्या पोती भरून बाहेर जात होते तर काठावर मेलेल्या माशांचा ढिग पडला आहे तसेच नदीमध्ये बरेच जलपर्णी असून प्रदूषित पाणी आल्याने जलप्रणी वाहून बंधाऱ्याला येऊन तटली असल्याने प्रदूषित पाणी व जलपर्णी याबाबत संबंधित विभाग नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करणार का असा प्रश्न नागरिकांतुन विचारला जात आहे.
