Top News

एसएससी बॅच सन २००४-०५ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात

 हैदरअली मुजावर / शिरढोण

शिरढोण येथील रयत शिक्षण संस्थेचे रमजानशेठ बाणदार विद्यालयाच्या एस एस सी बॅच सन २००४-०५ च्या माजी विद्यार्थी, विद्यार्थीनी व शिक्षक शिक्षिका यांचा स्नेह संमेलन(गाठी भेटी) मेळावा साजरा करण्यात आला.या कार्यक्रमांचे नियोजन अगदी चांगल्या पद्धतीने करण्यात आले.या कार्यक्रमांचे उद्देश असे होते की जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी माजी विद्यार्थी विद्यार्थीनींनी हा कार्यक्रम आयोजित केला.या शाळेतील माजी शिक्षकांना देखील या कार्यक्रमात सहभागी करुन घेतले व जुन्या आठवणी ताज्या केल्या.शिक्षकांनी आपल्याला जे शिकविले त्या शिक्षणाचे महत्त्व कोणत्या प्रकारे प्राप्त झाले या कार्यक्रमात सांगण्यात आले.कुभांर जसं मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके बनवितो त्याचप्रमाणे आपल्या शिक्षकांनी देखील चांगले संस्कार केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांना घडविले कोणी डॉक्टर झाला तर कोणी इंजिनिअर कोणी पोलिस झाला तर कोणी शिक्षक.या कार्यक्रमात वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळण्यात आले. सर्वांनी मिळून डॉन्स, संगीत खुर्ची मनोरंजन उपक्रम राबविले.अनेक विद्यार्थ्यांनी व विद्यार्थीनींनी आपल्या मनोगतातून भावना व्यक्त केल्या.कार्यक्रम संपन्न होताच शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थीनींनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.


थोडे नवीन जरा जुने