कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील राजर्षी शाहू पतसंस्थेला आर्थिक वर्षात १ कोटी १४ लाखाचा नफा झाला आहे. कर्जाची वसुली ९९ टक्के झाली असून व्यवसाय आणि सामाजिक बांधिलकीतून सहकारात आदर्श निर्माण केला असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख माजी नगराध्यक्ष दादासो पाटील व अध्यक्ष किरण आलासे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. संस्थेचे खेळते भांडवल ११० कोटी असून उलाढाल ६३२ कोटी रुपयांचा आहे. संस्थेची स्वनिधी ८ कोटी ९४ कोटी ठेवीचे उद्दीष्ट गाठले आहे. आर्थिक वर्षात ५५ कोटी कर्जाचे वाटप केले आहे तर १४९ कोटीचा व्यवसाय झाला आहे.
संस्थेला आठ वेळा बॅको पुरस्कार, आदर्श पतसंस्था, आदर्श चेअरमन, आदर्श सचिव अशा सहकारातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
संस्थेला सतत 'अ' आॅडीट वर्ग असून प्रधान कार्यालयासह सर्वच शाखा संघनकीकृत आणि कोअर बँकिंग सेवेत आहेत.
संस्थेच्या सर्व शाखा स्वमालकीच्या इमारतीत असून व्यवसायाबरोबरच विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होवून सामाजिक बांधिलकी जोपासत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष रावसो उगारे, जेष्ठ संचालक जिनगोंडा पाटील, व्यवस्थापक संजय गजन्नावर उपस्थित होते.यावेळी धनपाल कोथळी, आण्णासो गुदले, महावीर पोमाजे, विजयकुमार जोंग, दौलत कांबळे, धोंडीराम चौगुले, पद्माराणी पाटील, सुषमा उपाध्ये आयेशा बागवान आदी उपस्थित होते.
