कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
शेतकरी कष्टकरी सर्वसामान्यांचा बादशाह असणारे राजू शेट्टी त्यांच्या लोकसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी परिसरातील गावातून 'एक वोट एक नोट' या धर्तीवर मोठे मताधिक्य देणार असल्याची ग्वाही कुरुंदवाड शहर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किरण गावडे यांनी दिली.
शेतकऱ्यांना घामाचे काम मिळवून देणारे माजी खासदार राजू शेट्टी हे नेहमीच शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी असतात. शेतकऱ्यांच्या उसाला मिळणारा कवडीमोल दर पाहता आज शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली असती मात्र राजू शेट्टी यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांची दर मिळाला आहे. याशिवाय एक रकमी एफ आर पी चा कायदा करण्यासाठी सरकारला भाग पाडले असून उसाबरोबर इतर पिकांनाही हमीभाव मिळवून देण्यासाठी त्यांना लोकसभेत पाठवणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या बरोबर राजू शेट्टी यांनी कष्टकरी, विद्यार्थी, सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच अग्रभागी असतात. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत मतदार डोक्यावर घेतील यात मात्र शंका नाही.
